Welcome to Happy Shoopy

Professional Catalogue

About Dattrup

Hello! My name is Dattrup. I specialize in creating dynamic online marketing strategies and solutions. With extensive experience in the field, I am here to help you elevate your business and reach your target audience effectively.

Services

Contact Me

If you're interested in my services or have any questions, feel free to reach out to me through the following:

Email: dattrup@example.com

Phone: (123) 456-7890

-->

..दिवाळी पाडवा.--- दाम्पती जीवनातील आदर, कृतज्ञतेचा संगम


https://shribhakt.blogspot.com

   

 आज दिवाळी पाडवा आहे. यालाच बलीप्रतिपदा असेही म्हणतात.
    पौराणिक कथेत प्रतिपदेच्या दिवशी महाप्रतापी आणि दानशूर राजा बळी यावर विजय प्राप्त करुन विष्णू जेव्हा वैकुंठात गेले तेव्हा लक्ष्मीने त्यांचे औक्षण करुन स्वागत केले.तसेच याच दिवशी पार्वतीने शंकराला द्युत या खेळात हरविले. म्हणून या दिवसाला द्युत पाडवा असेही म्हणतात
असा उल्लेख आहे.


         *बदलत्या काळात जुन्या प्रथा परंपरांचा नव्याने  अन्वयार्थ समजून घेतला तर आपल्या प्रत्येक पंरपरेत - रुढीत एक कौटुंबिक व सामाजिक आनंद निर्मिती
दडली आहे असे आपल्याला नक्कीच वाटेल.


       दिवाळी पाडव्याचा  जो संदर्भ दिला आहे त्याकडे आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर आपणास  लक्षात येईल की पती पत्नीच्या एकमेकां विषयींच्या आदर भावना व्यक्त करण्यासाठी या प्रथा होत्या.


   विजयी होवून येणाऱ्या पती विष्णूला त्याची पत्नी आदराने ओवाळते, त्याचा आदर सन्मान करते आणि विष्णू प्रसन्न होवून पत्नीला महालक्ष्मी संबोधतो, ही परंपरा आजच्या धकाकीच्या जीवनात पती-पत्नीतील आदर आणि परस्परांवरी विश्वास व्यक्त करण्यास पुरेशी आहे.


 सहजीवनास प्रारंभ करताना दाम्पत्य एकमेकासाठी अनोळखी असतात. सहजीवन विस्तारते तसे एकमेकांना ते ओळखू लागतात. ओळखीतून विश्वास निर्माण होतो. विश्वास हा परस्परांवरील प्रेमात रुपांतरीत होतो. विश्वासाची अंतिम अवस्था परस्परांवरील आदरात असते. पती-पत्नीतील सुखाची किंवा समर्पणाची समाधिस्थ अवस्था ही परस्पराप्रति आदराची असते. हा आदर सहजीवनाच्या प्रारंभी कधीच नसतो. तेव्हा असते केवळ आकर्षण आणि शरीराचे समर्पण.


      दिवाळी पाडव्याला पत्नी विश्वास आणि आदराने पतीला ओवाळते. आयुष्यातील लहान मोठ्या अडचणी किंवा समस्यांवर विजय मिळविल्याचा त्यात आनंद असतो. अशी पत्नी लक्ष्मी रुपात असते. कधीकधी पत्नी सुध्दा पती सोबत नियतीच्या संघर्षावर मात करते. अशी पत्नी पार्वती रुपात असते. म्हणूनच दिवाळीच्या पाडव्याला परस्परांप्रति असलेला आदर व्यक्त करण्यासाठी औक्षणाची करण्याची प्रथा अस्तित्वात आली.


    दिवाळी पाडव्याच्या औक्षणानंतर पती-पत्नीस सस्नेह भेट देतो. अशी भेट देणे म्हणजे नात्यांची गुंफण अधिक घट्ट करणे होय. दिवाळी पाडव्याचा हा भावार्थ दाम्पती जीवनाला प्रगल्भ व समृध्द करणारा आहे असे मला वाटते.


सर्व मित्र परिवार व हितचिंतकांना दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक  शुभेच्छा !!

दिवाळी पाडवा / बलिप्रतिपदा




shribhakt.blogspot.com



दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पती आणि माहेरच्या व सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

बलिप्रतिपदेला भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा करतात. बळी हा असुर राजा होता. त्याला त्याच्या पदाचा खूप गर्व झाला होता त्याला त्याच्या अहंकाराची शिक्षा देण्यासाठीच भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याला पाताळ लोकी पाठविले. काही लोक वामनावताराने गर्वहरण केलेल्या बळीला शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणतात परंतु शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणजे खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम हा आहे. त्याची हत्यारे सुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------

दिवाळीचा चवथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा, या दिवशी बळीची पूजा करतात. राक्षस कुळात जन्म घेऊनही बळीच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्‍वरीय कार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्‍वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो, हे यावरून स्पष्ट होते.


बलिप्रतिपदा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्रथा आहे. बळीराजाचा हा स्मरणदिन आहे.

बलिप्रतिपदेची आख्यायिका :

बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता. त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेतं. त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णू देवाला साकडे घातले. विष्णू वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला. तेव्हा “तुला काय हवे ते माग” असे बळी राजाने विचारले. यावर “फक्त त्रिपादभूमी हवी मला” वामन उत्तरला. सर्व काय ते बळी उमजला. परंतू शब्द दिला तो त्याने पाळला आणि “दिली भूमी” म्हणून गरजला. वामनाने एका पावलात स्वर्ग व्यापला तर दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारताचं बळीने आपले मस्तक पुढे केले आणि विष्णूने त्याला पाताळात गाडले.

बळीराजाची दानशूरता पाहून वामन खूप आनंदी झाला, वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते.


त्यासोबतच विष्णूने त्याला एक वर दिला. ‘जो कोणी बलिप्रतिपदेला दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत. त्याच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास राहील’.
या प्रसंगामुळे लक्ष्मीला आपल्या पतीचे खूप कौतुक वाटले म्हणून तिने पती विष्णूचे औक्षण केले, त्याला ओवाळले. विष्णूने हिरे माणके, अलंकार ओवाळणी म्हणून घातले. यामुळेच आजही बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो.

तसेच श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन पूजेची सुरवात केली होती. निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची ही सुरुवात होती. त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका आणि गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा केली जाते.